जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांना प्रशासकीय लोकसेवा पुरस्कार

सोलापूर दि.५(क.वृ.):- सोलापूर जिल्हयात मुख्य सांडपाणी व्यवस्थापनात सांडपाणी साठी शौषखड्डे बनविणेत उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल अरुण बोंगीरवार उत्कृष्ट प्रशासकीय लोकसेवा पुरस्कार नंदूरबार चे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांना जाहिर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या यशदा या संस्थेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर आज या पुरस्काराची घोषणा केला आहे.
डाॅ. अरूण बोंगीरवार फाऊंडेशन च्या वतीने १ लाख रूपये धनादेश , सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हस्ते डाॅ. राजेंद्र भारूड यांचा गौरव केला जाणार आहे. गरीब लोकांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणारे प्रयोग, कचरा पृथक्करण आणि रिसायकलिंग वाढविणे, वन क्षेत्र वाढवणे, किंवा जैवविविधतेसाठी कार्य करणारे तसेच आर्थिक, पर्यावरणीय, सामाजिक किंवा अशा कोणत्याही संकेतकांचा वापर करून प्रभावी मापनक्षम निर्माण करु शकलेले अधिकारी यांचा या पुरस्कारासाठी निवड केली जाते. आज यशदाने घोषणा केल्यानंतर डाॅ. भारूड यांचे राज्यभरातून अभिनंदन केले जात आहे.
सोलापूर जिल्ह्यात पाणी व स्वच्छता विभाग व ग्रामपंचायत विभाग यांचे संयुक्त विद्यामाने ही मोहिम हाती घेण्यात आली होती. डाॅ. राजेंद्र भारूड हे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. तर आमदार संजय मामा शिंदे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील , जिल्हा कक्षाचे कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कक्ष अधिकारी अविनाश गोडसे , यशवंती धत्तुरे, शंकर बंडगर, प्रशांत दबडे, मुकुंद आकुडे यांचेसह जिल्ह्यातील गटविकास अधिकारी , विस्तार अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. वडाळा येथे जि प सदस्य बळीराम काका साठे यांनी १ हजार शौषखड्डे घेऊन विक्रम केला होता. या मोहिम राबविणेत आली होती. या मोहिमेची दखल केंद्र शासनाने घेऊन डाॅ. राजेंद्र भारूड यांना चेन्नई येथे निमंत्रीत केले होते. केंद्र शासनाने विशेष दखल घेतली. या कामामुळे तावशी ग्रामपंचायतीस यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते बेस्ट सरपंच पुरस्कार देणेत आला होता.
अध्यक्ष अनिरूध्द कांबळे , उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, सभापती विजयराज डोंगरे, सभापती अनिल मोटे, सभापती संगीता धांडोरे , सभापती शटगार स्थायी चे सदस्य उमेश पाटील, यांनी अभिनंदन केले आहे.
जिल्हातील कर्मचारी व ग्रामस्थांचे यश - जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून चळवळ उभी केली. ग्रामसेवक व अधिकारी व कर्मचारी व स्वच्छ भारत मिशन चा स्टाफ यांनी घेतलेले परिश्रम यामुळे हे यश मिळाले आहे. वडाळा सारख्या गावात मोठे काम उभे राहिले. जिल्ह्यातील सर्वांनी या मोहिमेस साथ दिली. देशात या अभियानाचे नाव झाले. ही मोहिम अशीच पुढे सुरू ठेवावी असे मत जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी बोलताना व्यक्त केले.
0 Comments