सहकार महर्षी कारखान्याच्या ५९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 6, 2020

सहकार महर्षी कारखान्याच्या ५९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ संपन्न

सहकार महर्षी कारखान्याच्या ५९ व्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ संपन्न

अकलूज (विलास गायकवाड) दि.६(क.वृ.): येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सण २०२० ते २०२१ चे ५९ व्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह मोहिते-पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते मंगळवार दिनांक ६ ऑक्टोंबर रोजी सकाळी १०.१५ वाजता संपन्न झाला.

सकाळी ९ वाजता संचालक लक्ष्मण शंकर शिंदे व त्यांच्या सुविद्य पत्नी हेमलता लक्ष्मण शिंदे या उभयतांच्या शुभहस्ते बॉयलर प्रदीपन समारंभ निमित्त श्री सत्यनारायण महापूजा संपन्न झाले.कारखान्याचे चालू गळीत हंगाम २०२० - २०२१ मध्ये १२.५० लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व मशिनरीच्या ट्रायल्स पूर्ण झालेल्या असून प्रति दिवशी ८ हजार मे.टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी यंत्र प्रणाली कार्यान्वित केली आहे. ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा भरलेले असून कारखान्याचे सर्व सभासद व बिगर सभासद यांनी नोंद दिलेला व बिगर नोंदीचा सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी केले.

या कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रकाशराव पाटील, संचालक नामदेव ठवरे, सुरेश पाटील, धनंजय चव्हाण, शंकरराव माने देशमुख, विजय माने देशमुख,विजय कुमार पवार, मिलिंद कुलकर्णी, राजेंद्र मोहिते, महादेव घाडगे, विश्वास काळकुटे, चांगदेव घोगरे,भारत फुले, भीमराव काळे,बापूराव पताळे, सतीश शेंडगे, रावसाहेब बर्डे, संचालिका कमल जोरवर, कामगार संचालक धनंजय एकतपुरे इतर मान्यवर धनंजय दुपडे,विनायक केचे, भीमराव रेडे, अनिलराव कोकाटे, रामचंद्र ठवरे, नामदेव चव्हाण, चंद्रशेखर दुरापे, मारुती घोडके, अमरसिंह माने देशमुख, दिलीप घुले, कारखान्याचे सभासद कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले सर्व खातेप्रमुख कामगार युनियन प्रतिनिधी व कर्मचारी यांचे उपस्थित शासकीय नियमांचे पालन करण्यात येऊन सामाजिक अंतर ठेवून सदरचा कार्यक्रम संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages