मास्क व साबणचे वाटप महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते करण्यात आले

सोलापूर दि.१७(क.वृ.) : स्वयं शिक्षण प्रयोग, युनिसेफ व हिंदुस्थान युनिलीवर यांच्या संयुक्त विदयमानाने सोलापूर महानगरपालिका वतीने प्रभाग क्र. १८ येथे बेघर निवास व परिसर येथे कोविड19 अंतर्गत मास्क व साबणचे वाटप महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते करण्यात आले. सोलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे तरी देखील सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क, सोशल डिस्टंसिंग पालन करावे व स्वयं शिक्षण प्रयोग, युनिसेफ व हिंदुस्थान युनिलीवर यांनी महापालिकेला सहकार्य केल्याबद्दल महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आभार मानले. यावेळी नगरसेवक शिवानंद पाटील यांनी या भागत मास्क व साबण वाटप केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले. सोलापूर शहरतील कोरोना प्रभाव कमी होत असला तरी भविष्यात वाढ होऊ नये व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी मदत करावे असे उपायुक्त धनराज पांडे म्हणाले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मनपा उपायुक्त धनराज पांडे, नगरसेवक शिवानंद आण्णा पाटील, गिरीश तबांके, समूह शिक्षण प्रयोग, पुणे, मंगल धुमाळ, शशिकांत पगडे, राजु क्षिरसागर, रवि बनसोडे, सिध्दु गायकवाड, नागेश माने, राम दाते, धीरज कुंभार या भागातील नागरिक उपस्थित होते.
0 Comments