Hot Posts

6/recent/ticker-posts

कांदा निर्यात बंदी मागे अन्यथा आंदोलन करणार - शिवसेना

कांदा निर्यात बंदी मागे अन्यथा आंदोलन करणार - शिवसेना

 शिवसेना तुळजापूर तालुक्याच्या वतीने तुळजापूर तहसीलदार यांना निवेदन!

तुळजापूर दि.१६(क.वृ.):- केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर घातलेल्या  बंदीचा  जाहीर  निषेध करुन निर्यात बंदी निर्णय त्वरीत मागे घ्यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इषारा शिवसेनेने तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन बुधवार दि.१६ रोजी दिला.

निवेदनात म्हटलं आहेकी काही दिवसापुर्वी  केंद्र सरकारकडून कांदा दर नियंत्रणमुक्त केले व कांदा अत्यावश्यक वस्तुच्या कायद्यातुन काडले असे असताना हि केंद्रातील भाजपा सरकारने कांदा उत्पादक शेतक-यांना न्याय दिला असा ढोल वाजविला गेला. आणि आता वेळ येताच दलालांना पैसे मिळावेत म्हणून केंद्र सरकारने पुन्हा कांदा उत्पादक शेतकरी विरोधी हा तुघलकी निर्णय घेतला.हा निर्णय दलालांना पोसण्यासाठी घेतल्याचा आरोप करुन अजून किती दिवस शेतक-यांचा बळी घेणार आहात. असा सवाल केला.

या निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा शिवसेना स्टाईल मार्गाने आंदोलन करन्याचा इशारा वजा  निवेदन    मा,उपजिल्हाप्रमुख शामराव पवार,,शहरप्रमुख सुधीर कदम,उपतालुका प्रमुख सुनील जाधव, कृ,उ.बा, उपसभापती संजय भोसले,उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे,बापुसाहेब नाईकवाडी,दिनेश रसाळ,अनिल भोपळे,महेंद्र सुरवसे,बालाजी पांचाळ आदीनी दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments