Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर खुर्दजवळील ओढ्यावरील पुलावर पाणी आल्याने काही तास वाहतूक बंद

तुळजापूर खुर्दजवळील ओढ्यावरील पुलावर पाणी आल्याने काही तास वाहतूक बंद


तुळजापूर दि.१६(क.वृ.):-  तुळजापूर शहरासह परिसरास बुधवार दि.१६ रोजी दुपारच्या सुमारास सुमारे दीड तास झालेल्या पावसाने झोडपुन काढले.

या झालेल्या पावसामुळे तुळजापूर खुर्द परिसरात असलेल्या ओढ्याला पाणी आले या ओढ्यावरील पुलावरुन सांयकाळी सहा वाजेपर्यंत पाणी दीड फुट चा वर पर्यत वाहल्याने या मार्गावरील केशगाव धारुर मोर्डा कडे जाणारी व येथुन तुळजापूर कडे येणारी  वाहतुक सांयकाळ पर्यत बंद होती. पाणी पुलावरुन ओसरल्यानंतर वाहतूक सुरु झाली.

या झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचक्रोषीतील सखल भागात पाणीच पाणी झाले होते तर ओढे प्रथमच दुथडी भरुन वाहत होते. बुधवार दुपारी साडेबारा वाजता मुसळधार पावसास आरंभ झाला तो दोन वाजेपर्यंत मुक्त पणे बरसला. या झालेल्या पावसामुळै तलावांन मध्ये पाणीसाठ्यास होण्यास आरंभ झाला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments