कुमारी अनिता रमेश गायकवाड यांची मानवी हक्क आणि जन जागृती जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड
सोलापूर दि.१७(क.वृ.):- कुमारी अनिता रमेश गायकवाड यांची मानवी हक्क आणि जन जागृती सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष पदी निवड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष कांबळे यांची निवड केली. याबद्दल लायन्स इंटरनॅशनल असोसिएशन अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीचे अध्यक्ष लायन डॉक्टर राहुल चंडक यांच्या शुभहस्ते जिल्हा महिला अध्यक्ष निवडीबद्दल कुमारी अनिता रमेश गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लायन्स क्लबचे झोन चेअरमन लायन संतोष गुळमिरे, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल डॉक्टर नारायणदास चंडक अनिता गायकवाड यांच्या निवडी बद्दल शुभेच्छा दिल्या.
यावेळी सचिव नागेश बुगडे,खजिनदार लायन मुकुंद जाधव, माजी अध्यक्ष लायन सोमशेखर ईरप्पा आहे, लायन हिराचंद धुळम, लायन सुनंदा शेंडगे, लायन राजीव देसाई, लायन विश्वनाथ स्वामी, लायन दत्तात्रय जामदार माजी सचिव, प्रथम उपाध्यक्ष लायन नंदीनी जाधव आणि इतर सन्माननीय सदस्य उपस्थित होते. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments