बहूजन समाज परिषदेचे विविध मागण्यासाठी ठिय्या आंदोलन

कुर्डूवाडी दि.२८(क.वृ.): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ पूर्वीप्रमाणे चालू करावे बँड बँजो ढोलीबाजा हलगी मंडळ वाघ्या मुरळी सनई वाद्य तमाशा आर्केस्ट्रा नाटक मंडळाच्या कलाकारांना सादरीकरण परवाना मिळावा व झालेले नुकसान भरपाई म्हणून बँक लोन दोन लाख रुपये मंजूर करण्याबरोबर विविध मागण्यांच्या संदर्भात बहुजन समाज परिषदेच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले आहे. यावेळी माढा तालुका मंडप लाईट डेकोरेशन कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, माढा तालुका फोटोग्राफर संघ व छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
दिलेल्या निवेदनात म्हटले की माढा तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व मायक्रो फायनान्स महिला बचत गट त्वरित बंद करून मनमानी वसुली थांबवावी, कलावंताना मानधन त्वरित चालू करावे,श्रावण बाळ योजना चालू करून प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी जमा करावा,प्रधानमंत्री आवास योजना रमाई घरकुल यासाठी वाढीव निधी तीन लाख पन्नास हजार रुपये करण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.
0 Comments