Hot Posts

6/recent/ticker-posts

जे.बी. मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

 जे.बी. मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन

सोलापूर (देविदास माने)दि.२८(क.वृ.): भवानी पेठ मड्डी वस्ती येथील जे.बी.मित्र परिवार व अक्षय ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन मंडळाचे आधारस्तंभ जगन्नाथ बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या  रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तु म्हणून पाण्याचे झार, मास्क, सॅनिटायझर जे.बी.मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आल्या.

जे.बी. मित्र परिवाराच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जे.बी. मंडळाचे अध्यक्ष विकी बनसोडे यांनी दिली.

यावेळी दिपक गवळी, विकी घाटंगरे, बापू गायकवाड, शशी जाधव, नितीश कांबळे, प्रथम जाधव, अजय वाघमारे, अभिषेक चंदनशिवे, आदित्य चंदनशिवे, विजय मोरे, अमर जेटीथोर, सागर जमादार, सागर विंचुरे, प्रितम ढावरे, विजय मस्के, संदिप महाले,कुमार नागराळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments