आज तुळजापूर तालुक्यात पन्नास कोरोना बाधीत रुग्णांपैकी शहरात त्रेचाळीस रुग्ण आढळले

तुळजापूर दि.१६(क.वृ.):- तुळजापूर तालुक्यात मंगळवार दि.15 रोजी कोरोना बाधीत रुग्णांनी अर्धे शतक मारले असुन यात शहरातील त्रेचाळीस रुग्ण आहात.
सप्टेंबर महिन्यात कोरानाचा कहर वाढतच असुन मंगळ वार दि.15 रोजी तुळजापूर तालुक्यात पन्नास जण कोरोना पॉजिटीव्ह निघाले व दोन जण मरण पावले आहेत. पन्नास पैकी त्रेचाळीस जण तुळजापूर शहरातील असुन ऐक मयत ही तुळजापूर शहरातील आहे.
यात महिलेचा उपचार दरम्यान मुत्यु झाला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शहरासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक बरोबरच मुत्यु प्रमाणात वाढ होवु लागल्यामुळे सर्वञ चिंतेचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील 108 गावातील बहुतांशी लहान मोठ्या गावांन मधुन रुग्ण आढळुन येत आहे. कोरोना बाधीत रुग्णांन मध्ये लोकप्रतिनिधी शाषकिय निमशाषकिय अधिकारी कर्मचारी व्यापारी राजकिय नेते मंडळी चा समावेश आहे.
सोलापूर जिल्हालगत असलेल्या गावांन मधुन प्रथमता मोठ्या संखेने रुग्ण आढळत होते. त्यानं हळुहळु शेजारचा गावात पसरुन तालुक्यातील बहुतांशी गावात कोरोनाने शिरकाव केला आहे, ठराविक भागात गर्दी वाढली.! तिर्थक्षेञ तुळजापूरात शाषकिय कार्यालय बँका मंदीर तसेच बसस्थानक परिसरात लोकांची गर्दी वाढली असुन सर्वाधिक गर्दी सर्वाधिक शाषकिय कार्यालय असलेल्या मंगळवार पेठ ते आंबेडकर चौक या परिसरात होत आहे.
0 Comments