ज्योती क्रांती परिषदेच्या चालक-मालक संघटनेच्या माढा तालुकाध्यक्षपदी भारत माळी यांची निवड

माढा दि.१६(क.वृ.): ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आज मोहोळ 'क्रांतीभवन' येथे संघटनेच्या चालक-मालक माढा तालुकाध्यक्षपदी मु. पो. धाणोरेचे भारत रामलिंग माळी यांची निवड करण्यात आली. मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष तथा ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी त्यांच्या निवडीची आज घोषणा केली.
प्रारंभी मानाचा फेटा,पुष्पहार व नियुक्ती पत्र देऊन भारत माळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशप्रवक्ता शिलवंत क्षिरसागर, युवकचे कार्याध्यक्ष सागर अष्टूळ, शहराध्यक्ष सोमनाथ माळी,सुलतान पटेल, बाळासाहेब माळी, ग्रामपंचायतचे माजी सदस्य जितेंद्र अष्टुळ हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना प्रदेशाध्यक्ष बारसकर म्हणाले की आपले किंवा आपल्या गावातील लोकांचे काम असल्यामूळे आपण ग्रामपंचायत,पंचायत समिती,तहसिल,पोलिस स्टेशन किंवा अन्य इतरत्र आपले काम घेऊन जातो कित्येकदा सांगून देखिल तो अधिकारी आपले काम करत नाही तेव्हा आपण एखादया पुढाऱ्याकडे जातो परंतू तो पुढारी देखिल तो जवळचा कि लांबचा हयावर काम करायचं की नाही ते ठरवतो. मग ना विलाजस्तव आपण त्या अधिकाऱ्याला मागेल तेवढे पैसे देतो. आणि त्याच्या वाईट सवयीला बळी पडतो ही सवयी आत्ता बदलली पाहिजे. जनतेच्या हिताची काम ज्योती क्रांती परिषदेच्या कार्यकर्तनी केली पाहिजेत एखादा अधिकारी ऐकत नसेल तर आंदोलनाच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्याला धडा शिकवला पाहिजे.
याकरिता सर्वाणी एकसंघ होऊन येणाऱ्या काळात ज्योती क्रांती परिषदेमध्ये काम केले पाहिजे असे आवहान शेवटी रमेश बारसकर यांनी केले. यावेळी माढा तालुका कार्याध्यक्ष दत्तात्रय राऊत,कुमार काळे, अविनाश सुतार, बापु दूधाळ,मारूती राऊत, वाल्मिक गुरव, दाऊद सय्यद, अंकुश माळी यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments