श्रीतुळजाभवानीचा नवराञोत्सव पुर्वतयारीला व्यापारी वर्गाचा ब्रेक

तुळजापूर दि.२८(क.वृ.):- कोविड-19 च्या वाढता प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर यंदा श्रीतुळजाभवानी मातेचा शारदीयनवराञोत्सव साधेपणाने भाविकांन विना साजरा करण्याचा हालचाली सुरु असल्याने यंदा शारदीयनवराञोत्सव पुर्व तयारीला ब्रेक लागला आहे.
श्रीतुळजाभवानी मातेचा शारदीयनवराञोत्सव हा पंधरा दिवसाचा कालावधीत साजरा होतो पंधरा दिवसापैकी तेरा दिवस तुळजापूर शहर अखंडपणे चोवीस तास उघडे असते व्यवहार चालुच असतात पण यंदा शहर अखंडपणे चालु राहणे अशक्य वाटत.
तिर्थक्षेञ तुळजापूरात श्रीगणेशाचे विसर्जन झाले की पुर्वतयारी सुरु होते प्रथम दुकानाचे भाडे व्यवहार ठरतात नंतर दुरुस्ती रंगरंगोटी सुरु होते या कालावधीत राज्यासह बाहेरील राज्यतील ठोक व्यापारी येवुन आँर्डर बुकिंग करुन काही टक्के रोख रक्कम घेवुन करतात व माल पाठवतात नंतर श्रीतुळजाभवानी मातैची मंचकि निद्रा चालु झाले कि माल भरणे व मांडणी सुरु होते.
हे सर्व सोपस्कर श्रीतुळजाभवानी च्या पुर्वसंधे पर्यत चालु असते नंतर माञ भाविकांचे आगमन सुरु होते नंतर येथील व्यापाऱ्यांचा व्यापार सुरु होतो तो सलग पंधरा दिवस सुरू च असतो शेवटी व्यापारी थकतात माञ व्यापार चालुच असतो.
शारदीय नवराञोत्सवाचा दहा दिवसात झालेल्या अर्थिक प्राप्ती तुन ठोक व्यापारी वर्गास पन्नास टक्के रक्कम पोहच केली जाते नंतर वेध लागतात ते अश्विनी पोर्णिमा उत्सवाचा या काळात सर्वाधिक विक्रमी संखेने म्हणजे सात ते आठ लाख भाविक येतात अश्विनी पोर्णिमा च्या व्यवसायातुन झालेल्या अर्थिक प्राप्ती तुन ठोक व्यापारी वर्गाचे राहिलेले देणे व सहा महिन्याचे दुकान भाडे देवुन शिल्लक राहिलेला पैसा भांडवल म्हणून घरखर्चासाठी वापरतात व व्यायारी आनंदाने दिवाळी सण साजरा करतात परंतु यंदा ग्राहक रुपी भाविक येणे अशक्य असल्याने व्यापार होणार नसल्यामुळे व्यापारी वर्गाने शारदीयनवराञोत्सव याञेचा तयारी बाबतीत संभ्रमावस्थेत पडला असुन कोरोना आटोक्यात येवुन मंदीर भाविकांनसाठी उघडेल व पन्नास टक्के तरी व्यापार होईल अशी आस लागुन बसला आहे.
माञ सध्या तरी नवराञउत्सव व्यापारी तयारीला ब्रेक लागला आहे. दुकान मालक दुकाने भाड्यानै देण्याचा पाट्या लावल्या आहेत माञ व्यापारी भाविक येणार कि नाही याची त्याला खाञी नसल्याने दुकाने भाड्याने करण्यासाठी धजावसा झाला आहे.
कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आली व शाषणाने मंदीर भाविकांनसाठी खुले केले तरच तिर्थक्षेञ तुळजापूर ची व्यापारगाडा रुळावर येणार आहे अन्यथा नभूतो नभविष्यतो अशा नुकसानास व्यापारी वर्गास सामोरे जावे लागणार आहे.
0 Comments