आ.प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नाने मराठी भवनसाठी निधी मंजूर

मसाप दक्षिण शाखेच्या पाठपुराव्याला यश
सोलापूर, दि.१२(क.वृ.):- सोलापूरमध्ये मराठी भवन व्हावे यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांनी केलेल्या मागणीला यश आले असून आ. प्रणिती शिंदे यांनी प्रयत्न करून राज्य सरकारकडून मराठी भवनसाठी निधी मंजुर करवून घेतल्याने पदाधिकाऱ्याकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
महाराष्ट्रातील सोलापूर हे महत्वाचे शहर आहे. मराठी साहित्य, नाट्य,संगीत आणि विविध कला समृध्द करण्यासाठी सोलापूर मधून अनेकांनी योगदान दिले आहे. अनेक प्रतिभावंत साहित्यिक, कलावंत या सोलापूरने महाराष्ट्राला दिले. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवर असूनही मराठी भाषेची वृध्दी करण्यात सोलापूर हे अग्रेसर आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये मराठी भवन असावे त्यातील एका विभागाला स्वर्गिय दत्ता हलसगीकर यांचे नाव द्यावे अशी अपेक्षा महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने आ. प्रणिती शिंदे यांच्याकडे व्यक्त करण्यात आली त्यानुसार स्व. डॉ.वासुदेव रायते, हास्यसम्राट प्रा.दिपक देशपांडे, प्रशांत बडवे, गुरू वठारे, रवी हलसगीकर यांचे शिष्टमंडळ आ. प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून मराठी भवनच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यावर सकारात्मकपणे प्रतिसाद देत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर गेल्या 7 ते 8 वर्षापासून मराठी भवनच्या मागणीचा पाठपुरावा करून आ. प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमध्ये मराठी भवन तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करून आणला. त्याबाबतचा आदेशही जिल्हा प्रशासलाना प्राप्त झाला. अथक परिश्रम आणि पाठपुरावा करून आ. प्रणिती शिंदे यांनी मराठी भवनसाठी निधी मंजूर करून आणला त्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, सल्लागार अविनाश महागांवकर, हास्यसम्राट दिपक देशपांडे, सहकार्यवाह गुरू वठारे,प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर, अभय जोशी यांच्या वतीने आ. प्रणिती शिंदे यांना पुष्पगुच्छ देवून आभार व्यक्त केले. सोलापूरच्या मराठी भाषिक रसिकांचे स्वप्न साकार होत आहे असे व्यक्त करून सोलापूरमधील मराठी भवन कसे असावे आणि त्यामध्ये काय असावे याबाबत चर्चा करण्यात आली भव्य दिव्य असे मराठी भवन सोलापूरमध्ये सर्वांनी मिळून उभा करू असे यावेळी ठरले.
सोलापूरकरांचे काम करण्यासाठीच निवडून आले - आ. प्रणिती शिंदे
मराठी भवन सोलापूरमध्ये व्हावे म्हणून मसाप दक्षिण सोलापूर शाखेकडून माझ्याकडे प्रस्ताव आला मी सोलापूरची लोकप्रतिनिधी म्हणून काम करणे माझे कर्तव्य आहे आणि सोलापूरकरांनी मला काम करण्यासाठीच निवडून दिले आहे प्रस्ताव जुना होता त्याचा पाठपुरावा केला आणि मराठी भवनसाठी निधी मंजूर करून आणला. माझ्या हातून हे काम होत आहे याचे मला समाधान आहे.
0 Comments