वालचंदचे 37 विद्यार्थी जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र ; उज्वल यशाची परंपरा कायम

तेजस गाडी महाविद्यालयात प्रथम
सोलापूर दि.१२(क.वृ.): जेईई (मेन) सेकंड ही परीक्षा सप्टेंबर, 2020 मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये वालचंद कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड सायन्सचे 37 विद्यार्थी जेईई (ॲडव्हान्सड) परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. हे सर्व विद्यार्थी जेईई (ॲडव्हान्सड) मध्ये उत्तीर्ण झाल्यास ते भारतातील विविध आय.आय.टी संस्थेत प्रवेश मिळण्यास पात्र ठरतील. 'शिक्षण हाच धर्म' हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या वालचंद शिक्षण समूह ने आपली यशस्वी परंपरा कायम राखली आहे.
जेईई (मेन) सेकंड मध्ये महाविद्यालयाचा तेजस वेणुगोपाल गाडी हा इतर मागासवर्गीय संवर्गातून सर्वाधिक 96.45 टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे. खुल्या प्रवर्गातून शहा निसर्ग प्रीतम हा 94.11 टक्के गुण मिळवून प्रथम आला.
जेईई (ॲडव्हान्सड) साठी पात्र विद्यार्थी असे – गाडी तेजस वेणुगोपाल, टाक अभिषेक अनिल, शहा निसर्ग प्रितम, बिराजदार अशुतोष संदिप, मढ्ढे वैष्णवी दिपक, कादे अनिकेत महेश, विटकर रोहित राजाराम, तेलसंग यश, धायगोडे प्रमोद चंद्रकांत, भोला कृष्णचरण प्रदिप, गडगी संजना प्रभाकर, माळी रोजन राजेंद्र, पुल्ली तेजस किशोर, कमले प्रशांत भिमाशंकर, इक्कलकी समर्थ परमेश्वर, बिराजदार विश्वजीत बसवराज, सिंग विशालकुमार, सत्यदेवप्रसाद, इमांदी हरिका व्यंकटरामण्णा, कोकरे प्रिती भिमराव, सौरभ सुर्यकांत लकडे, कलबुर्गी नागेश बसवराज, कनकी श्रावणी व्यंकटेश, मसली अभिषेक मल्लिकार्जून, अष्टगी निजगुरुराज सोमशंकर, कलशेट्टी समर्थ सिध्देश्वर, चिटमिल प्रथमेश श्रीनिवास, गडगे निरज रावसाहेब, संचेती श्रुती रविंद्र, कोळेकर हर्षा महावीर, टंगसाल अमान अब्दुल रहेमान, गजघाटे पुजा राजाराम, इंगळे शिवानी पांडूरंग, मंदोल्लु श्रावणी शंकर, थोरात तेजस्विनी उत्तम, सोनकांबळे अमोल सचिदानंद, शिंदे आयुष प्रमोद, पोळ सेजल संतोष.
सर्व विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष कोटी, उपप्राचार्य संजय शहा आणि समन्वयक सारिका महिंद्रकर यांनी सत्कार केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या समस्त विश्वस्तांनी अभिनंदन केले.
0 Comments