Hot Posts

6/recent/ticker-posts

वीजबिल विरोधात आंदोलन करणाऱ्या आजच्या पदाधिकाऱ्यांना अटक व सुटका

वीजबिल या विरोधात आंदोलन करणाऱ्या आजच्या पदाधिकाऱ्यांना अटक व सुटका


सोलापूर दि.११(क.वृ.):- मागील सहा ते सात महिन्यापासून म्हणजेच लोकडाऊन काळात सर्वसामान्यांच्या हाताला कामधंदा नसल्याकारणाने त्यांची घरची आर्थिक परिस्थिती अडचणीची झालेली असताना विज बिल मात्र मोठ्या प्रमाणात येत असल्याने ते विज बिल माफ करावे. याकरिता आम आदमी पार्टी कडून गुरुवारी विद्युत महावितरण कार्यालयासमोर टाळे ठोकू आंदोलन करण्यात आले वीज महावितरण विरोधात आंदोलन करणाऱ्या आम आदमीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली त्यानंतर त्यांची चौकशी करून सुटका करण्यात आली.
आम आदमी पार्टी सोलापूर तर्फे या संदर्भात मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी कार्यालय, पालकमंत्री तसेच वीज वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा सर्वसामान्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही म्हणूनच आज आंदोलन करून सोलापुरातील नागरिकांच्या व्यथा सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टी कडून केल्याची माहिती यावेळी आम आदमीचे संघटन मंत्री अॅड. खतिब वकील यांनी दिली.
चार पुतळा ते महावितरण कार्यालय जुनी मिल कंपाऊंड परिसरातून मोर्चा निघणार होता. त्यानंतर वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याची नियोजन होते. परंतु आंदोलनाच्या वेळेस मात्र स्थानिक पोलिस प्रशासनाने आम आदमी पार्टीच्या नेत्यांना तसेच कार्यकर्त्यांना चार पुतळा येथे ताब्यात घेतले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. निषेध फलक फडकविण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष असलम शेख, सागर पाटील, संघटन मंत्री अॅड. खतिब वकील, जिल्हा कार्याध्यक्ष एम. पाटील, लैला जमादार, अरफात इनामदार, नासीर मंगलगिरी, जैनुद्दीन शेख, हेमंत जाधव, बाबा सागरी, मनीष गायकवाड, रॉबर्ट गौडर, आनंद जाधव आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments