Hot Posts

6/recent/ticker-posts

डीसीसी बॅंकेच्या कर्मचार्यांनी उत्स्फूर्तपणे केले रक्तदान

डीसीसी बॅंकेच्या कर्मचार्यांनी उत्स्फूर्तपणे केले रक्तदान


सोलापूर (क. वृ.):- कोरोना सारख्या विषाणूच्या संसर्गामुळे प्रभावित झालेल्या रुग्णांना रक्ताची नितांत गरज भासत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बँक अधिकारी, कर्मचारी, वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने आयोजित शिबिरात 58 कर्मचाऱ्यांचे उस्फुर्त पद्धतीणे रक्तदान केले.
गुरुवारी प्रधान कार्यालयातील लोकनेते बाबुराव अण्णा पाटील सभागृहामध्ये आयोजित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे, सरव्यवस्थापक के. व्ही. मोठे यांच्या रक्तदानाने करण्यात आले.
यावेळी कोथमिरे म्हणाले जिल्हा मध्यवर्ती बँक ही ग्राम पातळीवरील आर्थिक संस्था म्हणून ओळखली जाते. बँकिंग व्यवसायाबरोबरच सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड व संवर्धन याविषयी जनजागृती करण्यात येते. तसेच आर्थिक साक्षरता मेळावे, दत्त गाव योजना आदी उपक्रमही राबविण्यात येतात. सध्या कोरोना विषाणू संसर्गामुळे रक्ताचा तुटवडा भासत असल्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
Reactions

Post a Comment

0 Comments