Hot Posts

6/recent/ticker-posts

भावी पिढी घडवण्यासठी शिक्षकांची जबाबदारी महत्वाची

भावी पिढी घडवण्यासठी शिक्षकांची जबाबदारी महत्वाची


लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण सोहळा संपन्न

सोलापूर दि.१५(क.वृ.): भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षकांची जबाबदारी महत्वाची असे गौरवोदगार लायन डॉक्टर अभिजित जोशी  रिजन चेअरमन यांनी काढले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब सोलापूर व्टिन सिटी च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लायन डॉक्टर अभिजित जोशी रिजन चेअरमन, श्रीनिवास पुजारी रिजन सचिव, माजी प्रांतपाल लायन डॉक्टर नारायणदास चंडक यांची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक लायन्स क्लबचे अध्यक्ष  लायन डॉक्टर राहूल चंडक यांनी केले . यावेळी 10 आदर्श शिक्षक यांना पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच लायन्स क्लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीच्या शिक्षक सदस्यांच्या सुध्दा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाॅल, मोमॉटो, प्रमाणपत्र ,बुके ,असे होते.

या कार्यक्रमात नागेश बुगडे यांनी सचिवांचा अहवाल सादर केला. तसेच लायन मुकुंद जाधव यांनी खजिनदार यांचा अहवाल सादर केला.  यावेळी डॉक्टर लायन नारायणदास चंडक यांनी आपले भाषणात शिक्षकांच्या विषयी आदर करून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब चे सर्व पदाधिकारी परिश्रम घेतले.  तसेच लायन हिराचंद धुळम ,श्रीमती सुनंदा शेंडगे,यांचा विशेष सत्कार करण्यात आला.लायन  सोमशेखर भोगडे,लायन राजीव देसाई  यांना डिस्टिक कडून आलेले लायन्स पिन देऊन गौरवण्यात आले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन एम जे एफ ममता बुगडे, लायन नंदिनी जाधव  केले .आभार प्रदर्शन नागेश बुगडे यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी सुरुची भोजनाचा लाभ घेतला.

Reactions

Post a Comment

0 Comments