बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी खासबाब म्हणून 50 कोटी रुपये येत्या दोन दिवसात मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

सोलापूर दि.१५(क.वृ.): आमदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीनुसार मा.उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी खासबाब म्हणून 50 कोटी रुपये येत्या दोन दिवसामध्ये मिळणार असे आदेश दिले. तसेच यापूढेही बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन ही दिले. बोरामणी आं
सोलापूरातील बोरामणी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीस डिसेंबर 2008 मध्ये मंजूरी देण्यात आली. सोलापूरला आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणारी होणार ही गोष्ट सर्वांना सुखावणारी होती. ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. सुशिलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे सोलापूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ मंजूर झाले. खर तर ही साधी गोष्ट मुळीच नव्हती. महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर वसलेल्या आणि सर्वच बाजूने महत्वपूर्ण असलेल्या सोलापूरला या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मंजूरीमुळे निश्चितच आणखी मोठ महत्व प्राप्त होणार होत. जगाच्या नकाशावर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे अत्यंत ठळकपणे सोलापूर समोर येताना खरया अर्थाने सोलापूरच्या औद्योगिक विकासाला ही चालना मिळणार होती. भविष्याचा विचार करता अशा प्रकारच्या विमानतळाची सोलापूरला गरज होतीच. मा. श्री. सुशिलकुमार शिंदे यांनी पुढिल गरज ओळखूनच यासाठी विशेष प्रयत्न केले. भविष्यात सोलापूरचा चेहरा बदलणारया या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भूसंपादन देखील वेगान झाले. आवश्यक तो मोबदला ही दिला गेला. 550 हेक्टर जमीन देखील संपादित झाली. भूसंपादनाच क्लिष्ट आणि किचकट प्रक्रिया तितक्याच वेगात आणि यशस्वीपणे पार पडली. तब्बल 1375 एक्कर इतकी जमीन या विमानतळासाठी संपादित करण्यात आली. काँग्रेस-राष्ट्रवादीची राज्यात सत्ता असताना आणि मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी बोरामणी विमानतळाच्या विकासकामांबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखविलेला होता. 51 टक्के केंद्र शासन आणि 49 टक्के राज्य शासन अशा संयुक्त माध्यमातून विकासकामाची जबाबदारी ठरली होती. राज्याच्या अर्थसंकल्पातून दरवर्षी 20 कोटी देण्याचे ठरले.
परंतू गेल्या 5 वर्षामध्ये बोरामणी येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी नया पैसाही मिळाला नाही. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. अजित पवार साहेंब यांच्याकडे बोरामणी विमानतळाच्या विकासासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्याअनुषंगाने आजरोजी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे मंत्रालयामध्ये मा. उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार साहेब, आमदार प्रणिती शिंदे व इतर अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली. यामध्ये खासबाब म्हणून येत्या दोन दिवसामध्ये 50 कोटी रुपये निधी मिळणार व तात्काळ काम सुरु करण्याचे आदेश दिले. तसेच यापूढेही बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन ही दिले.
यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे साहेब, अतिरिक्त मुख्य सचिव, नियोजन विभाग, महाराष्ट्र देवाशिष चक्रवर्ती, आमदार संजय शिंदे, मा. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर साहेब, प्रांताधिकारी चव्हाण मॅडम, बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मॅनेजर श्री. सज्जन निचळ आदि. उपस्थित होते.
0 Comments