Hot Posts

6/recent/ticker-posts

मनसेचे नळदुर्ग येथे थाळीनाद आंदोलन

मनसेचे नळदुर्ग येथे थाळीनाद आंदोलन


तुळजापूर दि.६(क.वृ.):- तालुक्यातील नळदुर्ग येथे विद्युत पोलच्या सिमेंट काॅक्रिटीकरणासाठी नळदुर्ग येथे मनसेचे थाळीनाद आंदोलन करण्यात आले, नळदुर्ग शहरात विद्युत पुरवठा करण्यासाठी कांही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमार्फत शहरात ठिकठिकाणी विद्युत पोल उभे करण्यात आलेले आहेत.हे पोल उभे करताना खड्ड्यांमधे मजबूतीसाठी सिमेंटकाॅक्रिट ऐवजी दगड व मातीचा वापर केला आहे. त्यामुळे  पावसाने माती खचून सदर विद्युत पोल कधीही पडू शकतात.अशावेळी मोठा धोका होण्याचा संभव नाकारता येत नाही. मोठी जिवीतहानी सुद्धा होवू शकते. हे टाळण्यासाठी हे विद्युत पोल उभे करताना खड्ड्यांमधे सिमेंट काॅक्रिट भरावे.यामागणीसाठी नळदुर्ग शहर मनसेच्या वतीने संबंधित विभागाच्या अधिकार्यांना वारंवार निवेदने देण्यात आली. परंतु यास जबाबदार असणार्या वीज वितरण कंपनीने याची दखल न घेता दुर्लक्षच केले.
वीज वितरण कंपनी व सदर विद्युत पोल उभे करणार्या यंत्रणेला जागे करून वठणीवर आणण्यासाठी नळदुर्ग शहर मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या उपस्थितीत जिल्हासचिव जोतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, उपशहराध्यक्ष रमेश घोडके, मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण, सचिव भाऊराज कांबळे यांच्यासह पदाधिकार्यांनी नळदुर्ग येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर "थाळीनाद आंदोलन"करण्यात  आले.
तसेच सदर काम तातडीने करण्यात यावे अन्यथा दि.१४ सप्टेंबर रोजी मनसेच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयास "टाळे ठोकण्याचा"इशाराही देण्यात आला.  यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Reactions

Post a Comment

0 Comments