अर्जुनसोंडमधील प्रत्येक घराला मिळणार टपाल विभागाच्या योजनांचा लाभ

सोलापूर, दि.११(क.वृ.): मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंडमधील सर्व घरात टपाल विभागाच्या पंचतारांकित खेडे या योजनेतून टपाल विभागाच्या सर्व योजना पुरविल्या जाणार आहेत, अशी माहिती टपाल विभागाचे प्रवर अधीक्षक सूर्यकांत पाठक यांनी आज दिली.
केंद्रीय संचार आणि इलेक्ट्रॅानिक्स राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते गुरुवारी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील जनतेला टपाल विभागाच्या माध्यमातून जास्तीत जास्त बँकिंग सुविधा मिळाव्यात, ग्रहकांना लाभाच्या विविध योजनांचा थेट फायदा मिळावा यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. यामध्ये सेव्हिंग बँकेच्या योजना, सुकन्या समृद्धी योजना, आयपीबीबी खाते, टपाल जीवन विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि जीवन सुरक्षा योजना यांचा समावेश आहे, असे श्री पाठक यांनी सांगितले. यावेळी सहायक डाक अधीक्षक सोमनाथ काळे उपस्थित होते. अतुल थलकर यांनी सूत्रसंचालन केले.
0 Comments