कृषी दुत माने यांनी वाळलेला चारा प्रक्रिया प्रात्याक्षिक करून दाखवले

अकलूज दि.२१(क.वृ.): माळशिरस तालुक्यातील गिरझणी येथे ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी औद्योगिक, कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत कार्यरत असलेल्या डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन विळद घाट, अहमदनगर येथील कृषी महाविदयालयाचा कृषी दुत माने रामराजे अभिमन्यू याने गावातील शेतकऱ्यांना वाळलेला चार प्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करत माहिती दिली की दुष्काळ ग्रस्त भागात जनवारांना उन्हाळ्यात चाऱ्याची कमतरत भासते म्हणून हंगामील आपल्या शेतातील ओला चारा आपण वाळवून त्यावर योग्य प्रक्रिया करून तो जनवाराना सकस कसा होईल, व कमी खर्चात जास्त जनवारे कशी सांभाळता येतील की त्यामुळे त्यांच्याकडे उपलब्ध गाईचे जास्तीत जास्त दुध उत्पादन, फॅट % एस. एन. एफ. व दुधाची गुणवत्ता कसे वाढेल या विषयी रामराजे अभिमन्यू माने याने शेतकऱ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.
या उपक्रमा बाबत त्याला महाविदयालयाचे प्राचार्य मा .डॉ एम.बी धोंडे सर, उपप्राचार्य, डॉ.शिरसाठ सर, कार्यक्रम समन्वयक मा . प्रा .के एस दांगडे सर, कार्यक्रम अधिकारी प्रा.ए.व्हि भोसले सर, तसेच विषय तज्ञ डॉ. डी.एम नलवडे सर,तसेच, डॉ. राऊत सर, प्रा. निकम सर, प्रा. किशोर मोरे सर, प्रा. अमोल बेल्हेकर सर, प्रा. संदीप डमाळ सर, प्रा. जाधव सर, प्रा. ठोंबरे मॅडम, प्रा. दहातोंडे मॅडम, प्रा. हसनाळे मॅडम, प्रा. गागरे मॅडम, या सर्व प्राध्यापकांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.
0 Comments