श्री.दयानंद कोकरे यांचा सत्कार करण्यात आला

सोलापूर, दि.१७(क.वृ.): नुतन वरिष्ठ लेखापरिक्षक,(शिक्षण विभाग,सोलापूर) श्री.दयानंद कोकरे साहेब यांचा सोलापूर जिल्हा खाजगी प्राथमिक शाळा संयुक्त कृती समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या सेवा पुस्तकांच्या नोंदी अद्यावत करणे, स्टॅम्पिंग करणे याबाबतीत चर्चा करण्यात आली. यावेळी श्री.दयानंद कोकरे साहेबांनी संघटनेला सहकार्य करण्याचे व शिक्षकांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषदेचे प्रदेश सचिव सुनिल चव्हाण, महाराष्टृ राज्य शिक्षक सेनेचे शहराध्यक्ष मुरलीधर कडलासकर,युवक शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सोमेश्वर याबाजी,अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ.गफुर अरब,अंबादास चव्हाण,संतोष माशाळे,वैभव होनमुटे,तिम्मण्णा माने,अनिल उडचणकर,घोडके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments