Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठवाडा मुक्ती दिन साधेपणाने साजरा

मराठवाडा मुक्ती दिन साधेपणाने साजरा


तुळजापूर दि.१७(क.वृ.):- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन गुरुवार दि.१७ रोजी कोरोना पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात साधेपणाने साजरा करण्यात आला. 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्ताने शहरातील छञपती शिवाजि महाराज पुतळ्या जवळ असणाऱ्या हुतात्मा स्मारकातील शहीदांचा  समाधीवर नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहुन विनभ्र अभिवादन करण्यात आले नंतर नगरपरिषद मध्ये नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्तै ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी बोलताना नगराध्यक्ष सचिन रोचकरी म्हणाले, यांच्या हुतात्म्या मुळे आपणास खऱ्या अर्थाने पुरूणत्व मिळाले. 

यावेळी नगरसेवक कर्मचारी नागरिक उपस्थितीत होते. आपसिंगा येथील मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा  श्रीधर वर्तक यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुण ग्रामस्थांनी अभिवादन केले.
Reactions

Post a Comment

0 Comments