पीयुसीचे दर वाढविल्यास कारवाई करणार
उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा निर्णय

सोलापूर, दि.२८(क.वृ.): जिल्ह्यातील कोणत्याही पीयुसी सेंटरला दर वाढविण्याचे अधिकार नाहीत, दर वाढविल्यास कारवाई करण्यात येणार आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यातील ऑल पीयुसी सेंटर ओनर्स असोसिएशनने 26 सप्टेंबर 2020 रोजी पीयुसी दर वाढविण्याबाबत निवेदन दिले होते. मात्र पीयुसी सेंटर आणि पीयुसी सेंटर ओनर्स असोसिएशनला दर वाढविता येणार नाहीत, दर वाढविल्यास कारवाई करण्यात येणार आहे. पीयुसी सेंटरने पीयुसीचे जास्त दराने पैसे घेतल्यास ग्राहकांनी बील पावतीसह mh13@mahatranscom.in या ईमेल आयडीवर तक्रार करण्याचे आवाहन श्री. डोळे यांनी केले आहे.
0 Comments