पहिल्या सत्राच्या आधारे होणार विद्यार्थ्यांचे प्रवेश
सोलापूर,दि.: एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या कोरोनामुळे प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांच्या मागील शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार निवड करून प्रवेश होणार असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
ऑनलाईन परीक्षा रद्द झाल्याने सहावीच्या वर्गात नवीन प्रवेश आणि इ. 7 वी ते 9 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांची सन 2019-20 मधील सातत्यपूर्ण प्रथम सत्राच्या गुणाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश हे त्यांच्या पालकांच्या मूळ पत्त्यानुसार प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये देण्यात येतील. ज्या प्रकल्पांतर्गत हे स्कलू नाही, अशांना जवळच्या प्रकल्पात कार्यान्वित असलेल्या शाळेत प्रवेश देण्यात येईल, या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी, आर्किटेक्ट कॉलेजजवळ, कुमठा नाका, सोलापूर (दूरध्वनी-0217-2607600) येथे संपर्क साधावा.
0 Comments