Hot Posts

6/recent/ticker-posts

खोल आडातील आगळेवेगळे श्री गणेश मंदीर

खोल आडातील आगळेवेगळे श्री गणेश मंदीर


 सध्या श्रीगणेशाची अर्धी मुर्ती पाण्यात
तुळजापूर दि.२२(क.वृ.):- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तुळजापूर पंचक्रोषी अनेक विघ्नहर्ता श्री गणेशाचे मंदीर असुन यातील ऐक अतिप्राचीन1704चे  मंदीर प्राचीन साठ फुट आडात आहे.
सध्या या मंदीरातील विघ्नहर्ता ची मुर्ती समाधानकारक पर्जन्यमान झाल्याने अर्धी गणेश मुर्ति पाण्यात असुन सध्या पाण्याच्या पुजा करुन च गणेश पुजा केल्याचे समाधान मानले जाते.
सदरील अतिप्राचीन आड साठ फुट खोल असुन यातील गणेश मंदीर जमिनी पासुन खोल  वीस फुट अंतरावर आहे या गणेशाचे मंदीर हेमाडपंथी असुन हवा व प्रकाश मिळावा म्हणून वरच्या बाजुस शिखरा ऐवजी प्रकाश व हवा येण्यासाठी मोकळी बांधकाम न,करता जागा सोडली आहे.
परेश व्यास यांच्या मालकीच्या या आडातील गणेशाचा दर्शनासाठी महिन्याचा चतुर्थीला व श्री गणेशउत्सवात मोठी गर्दी होत असते सदरील श्रीगणेश मंदीरातील मुर्ती शेद-या रंगाची व बैठी मुर्ती आहे.आडाचे काम करताना,ती उत्खननात सापडल्याची माहीती श्री गणेशाचे पुजारी परेश व्यास यांनी दिली.
Reactions

Post a Comment

0 Comments