राष्ट्रीय खेळाडू सारिका काळे यांच्या कामगिरीने उस्मानाबादचे नाव देशपातळीवर किर्तीमान - उल्हास दादा बोरगावकर

तुळजापूर दि.२२(क.वृ.): तुळजापूर तालुका क्रीडा अधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कुमारी सारिका काळे यांना केंद्र शासनाचा अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास दादा बोरगावकर यांच्या हस्ते त्यांचा गौरवपर सत्कार करण्यात आला. मानाचा अर्जुन पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कुमारी सारिका काळे या बालाघाट शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थी आहेत.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथे राष्ट्रीय खेळाडू सुवर्णकन्या कु सारिका काळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालय सोशल डिस्टन्स ठेवून संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सचिव उल्हासदादा बोरगावकर यांनी सारिका काळे यांच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचाली बद्दल मुक्तकंठाने स्तुती केली. प्राचार्य डॉ. मोहन बाबरे, उप प्राचार्य डॉ एन. बी. जाधव, सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले, सिनेट सदस्य डॉ गोविंद काळे, अधीक्षक धनंजय पाटील, प्रा. जी व्ही पाटील, प्रा कपिल सोनटक्के प्रा अमोद जोशी, डॉ सतीश महामुनी यांची याप्रसंगी उपस्थिती होती.
0 Comments