Hot Posts

6/recent/ticker-posts

अक्कलकोट रोड येथील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये एल.पी.जी. गॅस दाहिनीची व्यवस्था आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नाला यश

 अक्कलकोट रोड येथील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये एल.पी.जी. गॅस दाहिनीची व्यवस्था आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नाला यश


सोलापूर दि.१३(क.वृ.): सोलापूर येथील अक्कलकोट रोड येथे सार्वजनिक स्मशानभूमी असून तेथे पूर्व विभागातील मयत झाल्यास त्यांच्या अंत्यविधीकरीता एल.पी.जी. गॅस दाहिनी उपलब्ध करून दिल्यास झाडांची कत्तल होणार नाही व निसर्गाचा समतोल राहिल. याठिकाणी एल.पी.जी. गॅस दाहिनी बसविल्यास तेथील गरीब लोकांना अत्यंविधीचा खर्च कमी होईल. याकरीता प्रविण मुसपेठ व अक्कलकोट रोड सार्वजनिक स्मशानभूमी सुधारणा समिती, सोलापूर या संस्थेचे सभासद यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना भेटून मागणी केली होती. याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये अथवा इतर शासनाच्या निधीमध्ये अक्कलकोट रोड येथील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये एल.पी.जी. गॅस दाहिनीकरीता निधीची तात्काळ मंजूर करण्यात यावी याबाबत सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनाव्दारे मागणी केली होती. यासंदर्भात सोलापूर महानगरपालिका, सोलापूर मा. आयुक्त यांनी अक्कलकोट रोड सार्वजनिक स्मशानभूमी येथे गॅस शवदाहिनी बसवून कार्यान्वित करून तद्अनुषंगिक कामे करणे. (र.रु. 56,12,434/-) या कामाकरीता इतका निधी मंजूर केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नाने सदर स्मशानभूमीकरीता निधी उपलब्ध झाल्यामुळे प्रविण मुसपेठ व अक्कलकोट रोड सार्वजनिक स्मशानभूमी सुधारणा समिती, सोलापूर या संस्थेचे सभासद यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments