महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेवर डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांची निवड करण्याची मागणी
अकलूज दि.१३(क.वृ.): महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागेची निवड होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडुन युवक नेते डाॅ.धवलसिंह प्रतापसिंह मोहीते पाटील यांची नियुक्ती करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
डाॅ.धवलसिंह मोहीते पाटील सारख्या उच्चविभुषीत शेती विषयात डाॅक्टरेट असलेल्या युवक नेतृत्वाला विधान परिषदेचे सदस्यपदी निवड करण्याचे मागणी साठी सोलापूर जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रातील विविध भागातून शेकडो कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बारामती येथे भेटुन निवेदन दिले आहे. याच बरोबर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंहदादा माने पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस राज्य कार्यकारिणी सदस्य पांडुरंगराव देशमुख यांचे सह अनेक पदाधिकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांचेकडेही या मागणीचे निवेदन दिले आहे.
धवलसिंह मोहिते पाटील यांना मानणारी युवकांची मोठी फळी सोलापुर जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसेवा संघटनेचे माध्यमातून कार्यकर्ते कार्यरत आहे. राजकारणामध्ये असुनही ते निर्व्यसनी ,निष्कलंक,नेते आहेत.त्यांचा स्वभाव हा लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहीते पाटील यांचे सारखा धाडशी व सर्वसमावेशक आहे. मागिल विधानसभा निवडणुकीमध्ये डाॅ.धवलसिंह मोहीते पाटील यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे माढा मतदार संघातील उमेदवार आमदार बबन शिंदे, माळशिरस मतदार संघातील उमेदवार उत्तम जानकर यांचे विजयासाठी प्रामाणिकपणे मोठ्या धडाडीने प्रचार केला होता. त्यावेळी झालेल्या मतदानात डाॅ. धवलसिंह मोहीते पाटील यांचा प्रभाव स्पष्टपणे राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वाला दिसुन आला आहे.डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे उत्कृष्ट वक्तृत्वशैली, सर्व क्षेत्रातील अनुभव युवकांमध्ये असलेले आकर्षण याचा मोठा फायदा राष्ट्रवादी पक्षाला होणार आहे.महाराष्ट्राचे राजकारणातील 50 वर्षाचा अनुभव असलेले खासदार शरदचंद्र पवार हे जाणते नेते असुन डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांचे सारख्या कर्तृत्ववान युवक नेतृत्वाला आमदार करून सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाला बळकटी देणेबरोबरच सोलापूर जिल्ह्याचे राजकारणात वेगळी खेळी करतील अशी चर्चा सुरू झाली आहे.
0 Comments