उजनी धरणाच्या डाव्या कालव्या वरील पुलाचे भुमिपूजन करुन कामास सुरवात

उजनी कालव्यास 70 लाख रुपये मंजुर
टेंभुर्णी दि.१३(क.वृ.): उजनी डाव्या कालव्यावर शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी पुलाची गरज होती कालव्यातच्या 26 km मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्यामुळे विभागल्या गेले असून शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी व ऊस काढण्यासाठी चार-पाच किलोमीटरचा वळसा घालून जाणे-येणे अनेक दिवसापासून करावे लागत होते त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत होते व शेती करण्यास अडचणी निर्माण होत होत्या यासाठी टेंभुर्णी चे युवा नेते ऋषिकेश बोबडे यांनी माढा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार बबनदादा शिंदे व संजय मामा शिंदे यांच्या लक्षात आणून देऊन दोन्ही आमदारांनी बोबडे यांच्या मागणीचा विचार करून मंत्रीमंडळात पाठपुरावा केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व यांच्या मार्गदर्शनाखाली या' ठिकाणी पुलाची मंजुरी करून घेतली सदर पुल हा टेंभुर्णीच्या वार्ड क्र 1 एक व वार्ड क्र 6 सहा मधील शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून बोबडे यांच्या या कामगिरीबद्दल शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे या ठिकाणी कुटे वस्ती, शेवरे, खुळे वस्ती, देशमुख वस्ती, मुळे वस्ती ,कोठावळे वस्ती ,झीरपे वस्ती या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी असून या ङाव्या कालव्या पुला मुळे शेतकऱ्यांना दळणवळणात फार मोठी मदत होणार असून शेतकर्यांची विस वर्षापूर्वीची मागणी ऋषिकेश बोबडे यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण होत आहे.
बोबडे यांच्या मागणीमुळे आमदार बबनदादा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून 70 लाख रुपये मंजूर करून घेतले असून या पुलाची लांबी 102 फूट असून 24 फूट रुंदी आहे येत्या चार ते पाच महिन्यात या पुलाचे काम पूर्ण होईल असे जलसंपदा विभागाचे साहाय्यक अभियंता साबळे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले याप्रसंगी उप अभियंता चमारीया उपस्थितीत व या भागातील पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थितीत व या पुलामुळे आनंद व्यक्त केला .
0 Comments