Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर तालुक्यातील भोसे गावातील पाटील कुटुंबांवर कोरोनाचे संकट

पंढरपूर तालुक्यातील भोसे गावातील पाटील कुटुंबांवर कोरोनाचे संकट


पंढरपूर दि.१३(क.वृ.):- पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये कायम सक्रिय राहिलेल्या भोसे गावातील पाटील कुटुंबावर कोरोनाने सर्वात मोठा घाला  घातलाय.  तालुक्याचे ज्येष्ठ नेते  स्वर्गीय यशवंतराव पाटील यांचे दोन चिरंजीव आणि एका सख्खा भावाचा कोरोनामुळे  धक्कादायकरित्या मृत्यू झालाय. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा  कार्याध्यक्ष,  खासदार शरद पवार यांचे एकनिष्ठ श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजू बापू पाटील यांचं कोरोनामुळे सोलापुरात निधन झालंय.  गुरुवारी मध्यरात्री एक वाजता सोलापुरात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय. 
तालुक्याच्या राजकारणात आपला दबदबा ठेवणार भोसे गावचे पाटील कुटुंबीय दहा दिवसांपूर्वी कोरोना  बाधित आढळून आले. 
पहिल्यांदा राजू बापू पाटील यांच्या चुलत्यांचे  करोनाने निधन झाले. त्यानंतर चारच दिवसांमध्ये राजू बापू पाटील यांचे धाकटे बंधू महेश पाटील  यांचा कोरोनामुळे बळी गेला. महेश हे घरीच उपचार घेत होते मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्याला  हलविण्यात येत असतानाच वाटेत  त्यांची प्राणज्योत मालवली. 
सर्वात धक्कादायक म्हणजे तालुक्याचे नेते राजू बापू पाटील यांचे देखील कोरोनाने आज मध्यरात्री एक वाजता सोलापुरात उपचारादरम्यान निधन झाले. 
दहा दिवसाच्या अंतरात एकाच कुटुंबातील तीन कर्ते पुरुष कोरोनाचे बळी गेलेत.   पाटील कुटुंबावर ओढवलेल्या दुःखद घटनेने तालुक्यात देखील शोककळा पसरली.  राजू बापू पाटील यांना मानणारा मोठा वर्ग पंढरपूर तालुक्यांमध्ये आहे.  त्यांच्या अचानक जाण्याने  पंढरपूरच्या राजकारणामधील एक जाणकार नेता गेल्याची भावना आता व्यक्त होते.
Reactions

Post a Comment

0 Comments