तिर्थक्षेञ तुळजापूरात अखेर छञपतींचा पुतळा मुळ जागी लवकरच विराजमान होणार !


तुळजापूर दि.१६(क.वृ.):- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तिर्थक्षेञ तुळजापूर पुण्यपावन नगरीत तब्बल दीड वर्षानंतर छञपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा विराजमान व सुशोभिकरण करण्यासाठी नगरपरिषदने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पुतळा सुशोभिकरण संकल्प चिञ अनावरण करुन उचलले आहे.
महाराष्ट्राचे प्रमुख धार्मिक शक्तीपीठ असणाऱ्या तुळजापूर नगरी मधील वैभवशाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चबुतरा दुरुस्त्तीसाठी काढण्यात आला होता, त्यानंतर मुळ जागे पासुन सहा ते सात फुट पुतळा सुशोभीकरणासाठी पुढे हलविण्याचा निर्णय झाला होता. याला शिवप्रेमींनी विरोध करताच नगरपरिषदचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी या बाबतीत शिवप्रेमींशी चर्चा करुन त्यांच्या भावना लक्षात घेवुन मुळ जागी पुन्हा बसविण्याचा निर्णय घेतला हे करीत असताना परिसर सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर सुशोभिकरणाचे संकल्प चिञ तयार करण्यात आले.
हे संकल्पचित्र फक्त तुळजापूर येथेच असुन इतर कुठेही नाही. या पुतळ्याच्या कामासाठी अत्यंत तज्ञ अरेखकाकडून जवळपास साडे सहा मीटर उंचीचा अत्यंत देखणा आणि लक्षवेधी चबुतरा तयार करण्याचा आराखडा तयार केला आहे. यातपुतळा परिसर गोलाकार असुन याचा परिघ बत्तीस मीटर आहे चबुतरा सहा मीटर उंच आहे, कंपाउंड वॉल अडीच फुट आहे, या साठी अंदाजित खर्च दीड कोटी येणार आहे पुतळ्याला अनुसरुन सुशोभिकरण आराखडा तयार केला आहे. यात किरकोळ बदल होण्याची शक्यता गृहीत धरुन हा आराखडा तयार केला आहे.
नगरपरिषद ने यासाठी विविध मंजुऱ्या घेण्यासाठी कार्यवाही सुरु केली आहे. नगरपरिषद सभागृहात या संकल्प चिञाचे अनावरण आहे. नगराध्यक्ष सचिन रोचकरी, महंत मावजीनाथ महाराज, महंत अरण्य महाराज, माजी नगराध्यक्ष बापूसाहेब कणे, मुख्याधिकारी आशिष लोकरे, ज्येष्ठ नगरसेवक अमर मगर, विशाल रोचकरी, आनंद कंदले, छावा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष जीवनराजे इंगळे, नानासाहेब लोंढे, अभिजित कदम, महादेव सोनार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
'पुतळा व सुशोभीकरण माझ्या कार्यकाळात होतेय हे माझे भाग्य' - मुख्याधिकारी अशिष लोकरे
यावेळी बोलताना मुख्याधिकारी डॉक्टर आशिष लोकरे म्हणाले कि 'माझ्या कार्यकाळात पुतळा विराजमान होतोय हे मी माझे भाग्य समजतो, यापूर्वी झालेल्या सर्व घटनांची नोंद घेऊन योग्य सूचनांचा आदर करत नगरपरिषदेने छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दिमाखदार होण्याच्या अनुषंगाने सुशोभीकरणाचा निर्णय घेतलेला आहे. त्याची सुरुवात लवकरच केली जाणार आहे.' असे सांगून आराखडा संदर्भात त्यांनी उपस्थित शिवभक्तांच्या सुचना ऐकुण घेतल्या .
नगराध्यक्ष सचिन रोजकरी यावेळी छञपती शिवाजी महारज पुतळा व पुतळा सुशोभिकरण बाबतीत अधिक माहिती सांगताना म्हणाले की 'छञपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार असुन सुशोभिकरणाचे काम चालू आहे. यावेळी प्रथमच शिवप्रैमी शहरवासिय यांना विश्वासात घेवुन पुतळा काम सुरु केले आहे. या कामासाठी नगरपरिषद किमान दीड कोटी रुपये खर्च करण्यास तयार आहे यासंदर्भातील महत्त्वाच्या आणि अखेरच्या प्रशासकीय मान्यता घेतल्यानंतर तातडीने व तात्काळ समुद्राच्या कामाला सुरुवात होईल यामध्ये हायड्रॉलिक शिडी वापरून राष्ट्रीय सण आणि आवश्यक आशा दिवशी शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे' असेही त्यांनी या वेळी सांगितले.
0 Comments