लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना माढा तालुका जनसेवा संघटनेच्या वतीने अभिवादन
लऊळ दि.२(क.वृ.): जनसेवा संघटना माढा तालुका व ग्रामपंचायत परिते यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना १००व्या जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.प्रतिमेचे पूजन परिते गावचे सरपंच विजयसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून अन्यायाविरोधात लढा देत आपले जीवन व्यतीत केले असे सरपंच विजयसिंह पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
याप्रसंगी हरी लांडे,माणिक लांडे,बजरंग लांडे,माजी सरपंच हनुमंत लामकाने,माजी सरपंच दिलीप लामकाने, बबन लामकाने,शंकर भोसले, रोहन वजाळे, संतोष वजाळे, राजू वजाळे, सोनू भोसले, अण्णाभाऊ साठे युवा मंचचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते याबरोबरच परिते ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments