Hot Posts

6/recent/ticker-posts

आठवीतील विध्यार्थींने टाकावू वस्तू पासुनराख्या बनवुन आत्मनिर्भर होणण्याचा दिला संदेश !

आठवीतील विध्यार्थींने टाकावू वस्तू पासुनराख्या बनवुन आत्मनिर्भर होणण्याचा दिला संदेश !


लोकरीचा घरीच  राख्या बनवुन आत्मनिर्भर बनण्याचा आठवीतील विध्यार्थींने दिला संदेश
तुळजापूर दि.२(क.वृ.):- येथील समिक्षा प्रविण कदम या इयत्ता आठवीत शिकणा-या विध्यार्थांनीने टाकावु वस्तु पासुन राखी पोर्णिमे साठी आपल्या भाऊरायासाठी आकर्षक राख्या बनवल्या असुन यातील ऐक राखी तयार करण्यासाठी पंधरा मिनीटे लागले असुन  अवघ्या अडीच रुपये खर्च आला आहे.
बहीण भावाचे अतुट नाते वृध्दांगत करणारा सण राखी पोर्णिमा असुन राखी पोर्णिमे ला चायना राख्याचा वाढणारे प्रमाण पाहता समिक्षा या विध्यार्थीनीला चीनने गलवान खो-यात देशाचा सिमेवर रक्षण करणाऱ्या आपल्या वीस सैनिकांना चीनी सैनिकांनी गाफील ठेवुन मारल्या ने ही घटना तिला   अस्वस्थ वाटत होती.
आपल्या सैनिकांना मारणारा देशाचा राख्या भाऊरायाचा हातावर कशासाठी बांधायाचा या अशी भावना तिच्या मनात निर्माण झाल्याने अस्वस्थ झालेल्या  समिक्षाने बाजारात जावुन लोकर आणली व घरच्या जुन्या  ड्रेसच्या गुंड्या वेगवेगळ्या रंगाचे मणी काढुन राख्या हाताने तयार करण्यास सुरुवात करुन अवाघ्या दहा ते मिनीटात ऐक अशा तासात चार राख्या लोकरीचा तयार केल्या .या कमीवेळेत कमी पैशात होणाऱ्या राख्या तिने तयार केल्या या कृतीतुन   देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर होण्याचा नारा कृतीत आणला
व चीन मध्ये बनलेल्या  राख्या खरेदी न करता घरीच लोकरीचा राख्या बनवा व भावाला राखी पोर्णिमा दिनी बांधा म्हणजे गलवान खो-यात शहीद झालेल्या आपल्या सैनिकांना ख-या अर्थाने श्रंध्दाजली ठरेल असा संदेश या चिमुकलीने दिला.
यातील ऐक सिमेवर लढणा-या सैनिकाला ऐक राखी  कोरोना योध्दाला व ऐक भावाला बांधुन रक्षाबंदन साजरा करणार असल्याचे तिने यावेळी सांगितले. 
Reactions

Post a Comment

0 Comments