मंदीरात बैलपोळा साजरा

तुळजापूर दि.१८(क.वृ.):- तिर्थक्षेञ तुळजापूरातील श्रीतुळजाभवानी मंदीरामध्ये बैलपोळासण मंगळवार दि.१८ रोजी अमावस्या दिनी मंदीर गर्भगृहात बैलजोडीचे पुजन श्रीतुळजाभवानी मातेच्या साक्क्षीने करुन पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला.
शहरातील कमानवेस भागातील डुल्या हनुमान मंदीरापासुन बैलजोड्या मिरवत श्रीतुळजाभवानी मंदीरात आणल्या गेल्या श्रीतुळजाभवानी मंदीरातील सिंह गाभाऱ्यातील चोपदार दरावाजा जवळ बैलजोडी नेण्यात येवुन त्याचे पुजन मंहत तुकोजीबुवा मंहत हमरोजी बुवा बुवा मंहत वाकोजी बुवा यांच्या हस्तै धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांच्या उपस्थितीत करण्यात आल्यानंतर आरती करण्यात येवुन बैलपोळा सण पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला.बळीराजाने माञ कोरोना पार्श्वभूमीवर साधैपणाने बैलपोळा सण साजरा केला.
0 Comments