Hot Posts

6/recent/ticker-posts

साधेपणाने बैलपोळा साजरा

साधेपणाने बैलपोळा साजरा


तुळजापूर दि.१८(क.वृ.):- तुळजापूर तालुक्यात कोरोना पार्श्वभूमीवर बैलपोळासणअंत्यंत साधेपणाने मंगळवार दि.18 रोजी अमावस्या दिनी साजरा करण्यात आला. श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान मध्ये पारंपारिक पध्दतीने कमानवैस भागातील डुल्या हनुमान मंदीरापासुन बैलजोड्या मिरवत श्रीतुळजाभवानी मंदीरात आणल्या गेल्या श्रीतुळजाभवानी मंदीरातील सिंह गाभाऱ्यातील चोपदार दरावाजा जवळ बैलजोडी नेण्यात येवुन त्याचे पुजन मंहत तुकोजीबुवा बुवा मंहत वाकोजी बुवा यांच्या हस्तै करण्यात आल्यानंतर आरती करण्यात येवुन बैलपोळा सण पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला.
आज बैलपोळा सणाचा पार्श्वभूमीवर सांयकाळी सजविण्यात आलेल्या  बैलांचे शेतकरी परिवाराने सहकुंटुंब पुजन करण्यात आले.नंतर ग्रामीण भागात बैलजोडी हनुमान मंदीरात नेवुन तिथे हनुमानाला श्रीफळ वाढवून मिरवणूक न काढता  बैल पोळा साजरा केला गेला.
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांकडून बैल पोळा हा सण साधेपणाने साजरा करण्यात  आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव चव्हाण  कु.स.सु. चेअरमन सुनील चव्हाण युवा नेते रणवीर चव्हाण अभिजीत चव्हाण यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments