Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुरात आज रानभाजी महोत्सव

 सोलापुरात आज रानभाजी महोत्सव

सोलापूर, दि.८(क.वृ.): सोलापूर जिल्ह्याचा जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव उद्या, रविवारी 9 ऑगस्ट 2020 रोजी शासकीय मैदानात विजापूर रोड सोलापूर येथे आयोजित केला आहे. सकाळी 10. 00 वाजता महोत्सवाचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, सकाळचे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमात रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्रीची व्यवस्था केली जाणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील रानभाजी उत्पादकांनी रानभाज्या विक्रीसाठी महोत्सवात आणाव्यात. सोलापूर शहरातील व परिसरातील नागरिकांनी रानभाज्याबाबत माहिती घेण्यासाठी आणि ताज्या व रसायनमुक्त रानभाज्या खरेदी करण्यासाठी यावे, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments