Hot Posts

6/recent/ticker-posts

सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे येथे सुविधा केंद्रावर डी. फार्मसी प्रवेशासाठी मोफत मार्गदर्शन केंद्र व ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु

सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे येथे सुविधा केंद्रावर डी. फार्मसी प्रवेशासाठी मोफत मार्गदर्शन केंद्र व ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु

ऑनलाइन अर्ज स्विकारण्याची तारीख 10/08/2020 ते 25/08/20 दरम्यान आहे.
सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे येथे औषधनिर्माणशास्त्र पदविका (डी. फार्मसी), पदवी (बी. फार्मसी) व पदयुत्तर (एम. फार्मसी) अभ्यासक्रम यशस्वीरित्या राबविला जात आहे.  यावर्षी देखिल प्रथमवर्ष पदविका (डी. फार्मसी), अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयाच्या मंजूर शासनमान्य केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अर्ज सुविधा केंद्रावर (Facilitation Center) अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रीया उपलब्ध आहे. या महाविद्यालयामध्ये सन 2020-21 करिता डी. फार्मसी प्रवेशा बाबत मोफत मार्गदर्शन केंद्र सुरु आहे. या केंद्रामध्ये प्रवेशप्रक्रीयेसाठी लागणारे गुणपत्रके, प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे व संपूर्ण प्रवेशप्रक्रीया या बाबतची संपूर्ण माहीती विद्यार्थी व पालक यांना देण्यात येणार आहे. 
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी प्रवेशप्रक्रीया व अर्ज पडताळणीसाठी विद्यार्थ्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले आहेत. (1) प्रथम पर्यायामध्ये सुविधा केंद्रावर जाऊन अर्ज भरणे, पडताळणी व निश्चिती करणे. (2) दुसऱ्या पर्यायामध्ये विध्यार्थी सुविधा केंद्रावर न जाता इंटरनेटचा वापर करुन (posthscdiploma2020.dtemaharashtra.gov.in) या लिंकवर अर्ज भरणे, सुविधा केंद्र निवडणे व निश्चित करणे आहे. अर्ज भरल्यानंतर निश्चित करणे (Confirmation) बंधनकारक आहे.
या सुविधा केंद्रामध्ये बारावी विज्ञान  उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पदविका (डी. फार्मसी), प्रवेशाकरीता ऑनलाइन अर्ज दिनांक 10/08/20 ते 25/08/2020 दरम्यान स्विकारले जाणार आहेत. या सुविधा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन  व मूळ कागदपत्रे पडताळणी होणार आहे.   तरी विद्यार्थ्यांनी  सुविधा केंद्रावर येताना  आपले सर्व ओरिजिनल  कागदपत्रे व दोन प्रती झेरॉक्स सेट सोबत घेऊन  येणे, खुला प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 400/- रुपये व मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 300/- रुपये शुल्क ऑनलाईन नेट बँकींग द्वारे किंवा एटीएम कार्ड द्वारे भरणा करायचा आहे. तरी फॉर्म भरण्यासाठी सुविधा केंद्रामध्ये येताना एटीएम कार्ड घेऊन येणे, याचबरोबर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया बाबत पालक व विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या विविध शंका व अडचणी याबाबत सखोल मार्गदर्शन  या महाविद्यालयात अनुभवी  व तज्ञ प्राध्यापकांमार्फत उपलब्ध होणार आहे. तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलिपकुमार इंगवले सर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. पाटील यांनी  केले आहे. याबाबत अधिक माहीतीसाठी प्रा. ए. एम. तांबोळी (9975402465), श्री. पी. एस. लोखंडे (9823107371), 9881433658, 7219515998, 9860026380, 8624979117, 9860601710 यांच्याशी संपर्क साधावा. 
शासनाने सांगितलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी महाविद्यालयात करण्यात आली आहे. तरी सुविधा केंद्रावर येतेवेळी विद्यार्थी व पालकांनी मास्कचा वापर करुन व सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून महाविद्यालयास सहकार्य करावे, अशी विनंती महाविद्यालयाकडून करण्यात आली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments