डॉ.धवलसिंहांनी केली मायक्रो फायनान्स व सर्व महीला बचत गटाचे कर्ज माफ करणेची मागणी
अकलूज दि.१२(क.वृ.): महाराष्ट्रातील मायक्रो फायनान्स व सर्व महीला बचत गटाचे कर्ज माफ करणेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रीयाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजला आहे. अनेक दिवसांपासून सगळीकडे लॉकडॉउन केले होते. यामुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे मोलमजुरी करणारे लोकांचे काम बंद झाले होते. घरातील पुरुषांना व मोल मजुरी करणाऱ्या महिलांना कसलेही प्रकारचे काम मिळत नसल्याने गोरगरिब जनता साठवलेली तुटपुंजी हि या लाॅकडाऊन मध्ये खर्च झालेने हतबल झाली होती व आजही तशीच परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत गोर गरीब कुटुंबातील लोकांना स्वतःचे कुटुंब जगवणे अत्यंत अवघड झाले असलेने मायक्रो फायनान्स व बचत गटाचे हप्ता व कर्ज भरणे शक्यच होणार नाही. मायक्रो फायनान्स व बचत गट घेणारी सर्व कुटुंब हे अत्यंत गरीब कुटुंब आहेत.सकाळी काम मिळाले तर संध्याकाळी चूल पेटते व तेव्हाच घर चालते अशी या लोकांची परिस्थिती आहे. या परिस्थितीतही या गोरगरीब लोकांनी यापूर्वी बचत गटाचे व मायक्रो फायनान्सचे सर्व हप्ते भरलेले आहेत.आशा वेळेवर कर्जाची परतफेड केली आहे परंतु सद्यपरिस्थितीत घर खर्च भागवणे अशक्य झाले आहे, सर्व महीलांची मानसिकता भयावह झाली आहे. कुटुंबे विस्कळीत झाली आहेत. महाराष्ट्रातील अशी लाखो कुटुंबे अत्यंत वाईट परिस्थितीत जीवन जगत आहेत अशा कुटुंबांना आपण आर्थिक आधार द्यावा व यांचे जीवनमान उंचवणेसाठी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्वच बचत गट व मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करणे बाबत विनंती आहे असे म्हटले आहे.
0 Comments