Hot Posts

6/recent/ticker-posts

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत बैठक संपन्न

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत बैठक संपन्न


मुंबई दि.१२(क.वृ.):- कोविड पार्श्वभूमीवर विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत खासदार शरद पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि इतर मागासवर्ग, बहुजन समाज  कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार  यांची  महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा - वसतिगृह संचालक संघाचे निमंत्रक लक्ष्मण माने यांनी  भेट घेत समस्या मांडल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा वसतीगृह संचालक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

आश्रम शाळांतील मूळ अडचण म्हणजे ही मुले दुर्गम डोंगराळ भागातल्या वाड्या-वस्त्या व तांड्यावरची असून त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यांना ऑनलाईन शिक्षण देणे कठीण आहे. शासनाच्या आदेशानुसार सध्या सर्व शाळा बंद आहेत. परंतु या समाजातील मुलांकडे अँड्रॉइड फोन नसल्यामुळे त्यांचे भवितव्य अंधकारमय होत आहे. आश्रमशाळांतील सर्व विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि अँड्रॉइड मोबाइल फोन पुरवण्यात येण्यासंबंधात सरकारकडून काय उपाययोजना करता येईल यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.

सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग स्वतंत्र करावा ही प्रमुख मागणीही या बैठकीत नोंदवण्यात आली. त्याचबरोबर विभागांतर्गत प्रशासकीय सुधारणा, थकित वेतन, शिक्षक भरती, परिपोषण अनुदान यासंदर्भातल्या मागण्या शरद पवार व मंत्री महोदय यांच्यासमोर अधोरेखित करण्यात आल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments