पंचवीस सर्पमित्रांचा उतरवला विमा


तुळजापूर दि.१७(क.वृ.):-भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचीत्य साधुन शहरातील जिगरबाज 25 सर्प मित्रांना आनंद (दादा) कंदले मित्र मंडळाच्या वतीने पंचवीस सर्पमिञांचा 1 लाख 25 हजारचा विमा कवच देऊन सत्कार करण्यात आला.
भाजपा आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शन खाली हा समाजपयोगी उपक्रम घेतला आहे. या मधे जखमी झाल्यास 25 हजारचा दवाखाना खर्च व जिवितहानी झाल्यास 1 लाख परिवाराला मिळतील.
याचे वाटप तुळजापुरचे नगराध्यक्ष श्री सचिन भैय्या रोचकरी, युवा नेते विनोद पिटुभैय्या गंगणे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे , नगरसेवक विजय आबा कंदले, आनंद कंदले पंडितराव जगदाळे, विशाल रोचकरी, सुहास साळुंके, अविनाश गंगणे, नागेश नाईक, शिवाजी बोदले, रत्नदिप भोसले, किशोर दरेकर,रामराजु जाधव, दत्ता राठोड, अनंत मोगरकर व आनंद दादा कंदले मित्र परिवार सहकारी उपस्थित होते.
0 Comments