धान्य उपलब्ध झाल्यानंतर केशरी शिधापत्रिकाधारकांना वितरण
अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांची माहिती
सोलापूर, दि.७(क.वृ.): सोलापूर शहरातील एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्याचे धान्य उपलब्ध झाल्यानंतर वितरण करण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांनाही 8 रूपये किलो दराने गहू आणि 12 रूपये किलो दराने तांदूळ वाटपाचे नियोजन केले होते. मे महिन्यात सोलापूर शहरात गहू 8934.70 क्विंटल तर 5952.10 क्विंटल तांदळाचे वितरण करण्यात आले. जून महिन्यातील धान्य खरेदीसाठी 7 कोटी 22 लाख 25 हजार रूपये भारतीय अन्न महामंडळाकडे जमा केले आहेत. मात्र रेशन दुकानदारांचा संप, भारतीय अन्न महामंडळातील कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने कार्यालय बंद असल्याने धान्याची उचल करता आली नाही. त्यांच्याकडील धान्य उपलब्ध झाल्यास केशरी शिधापत्रिकाधारकांना जून महिन्याच्या धान्याचे वितरण केले जाणार आहे, अशी माहितीही श्री. पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
0 Comments