Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकशाहीर साहीत्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दीच्या निमीत्ताने आयोजीत रक्तदान शिबिरात १५१ जणांचे रक्तदान

लोकशाहीर साहीत्यरत्न अण्णा भाऊ  साठे यांचे जन्मशताब्दीच्या निमीत्ताने आयोजीत रक्तदान शिबिरात १५१ जणांचे रक्तदान 


अकलूज दि.१(क.वृ.): लोकशाहीर साहीत्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे 2020 हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष असुन या निमीत्ताने जनसेवा संघटना व लहुजी शक्ती सेना नवनाथ भाऊ साठे मित्र मंडळाचे वतीने भव्य  रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबीरात 151 रक्तदात्यांनी रक्तदान  केले या शिबीराचे उदघाटन डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे हस्ते पांडुरंग (भाऊ) देशमुख यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 
यावेळी जनसेवा संघटनेचे माणिकराव मिसाळ, जनसेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव इंगवले देशमुख, शंकरराव मोहिते पाटील, बॅंकेचे चेअरमन सतिश नाना पालकर, जनसेवा युवक संघटनेचे अध्यक्ष अण्णा साहेब शिंदे, अण्णासाहेब इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा सरचिटणीस किरण साठे, खजिनदार रणजीतसिंह देशमुख, सह खजिनदार राजाभाऊ गुळवे, सन्मित्र संघाचे  सुरेश गंभीरे शिवसेना विभाग प्रमुख  उमेश जाधव जनसेवा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सुधीर रास्ते, मयुर माने सागर देशमुख   कार्यक्रमाचे संयोजक नवनाथ भाऊ साठे तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे, बाळु साठे, विजय खंडागळे, शिवाजी साठे, ज्योतीताई कुंभार उपस्थित होते. कोरोना विषाणु प्रादुर्भावामुळे संपुर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे म्हणून मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला रक्तदान करणेचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार जनसेवा संघटनेचे मार्गदर्शक नेते डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या मध्ये आज अखेर सुमारे 2100 रक्तदान केले आहे. याच अनुषंगाने लोकशाहीर साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी निमीत्ताने  रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.  सदरचा कार्यक्रम सोशल डिस्टेंन्स व शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम अटी पाळून करणेत आला. सदर कार्यक्रम यशस्वी करणेसाठी नवनाथ भाऊ साठे यांचेबरोबर विजय खंडागळे, सुरज रणदिवे, शिवाजी साठे, विकी बोरडे, सागर इंगळे, योगेश माने, अजय वाघमोडे, युवराज गोडसे,तन्वीर तांबोळी,मुस्ताक शेख,विजय जाधव
दादा खंडागळे,आकाश खंडागळे,मनोज गोसावी ,गोरख साठे,अनिस बागवान ,आदित्य गायकवाड, जमिर शेख,अरिफ मुजावर यांनी कष्ट घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments