तहसिल कार्यालायातील सहाजण कोरोना बाधीत
तुळजापूर तालुक्यात कोरोना चा उद्रेक
कोरोना तहसिल कार्यालयात घुसला!
तीन दिवसात 67जण कोरोना बाधीत !
तीन क्वारटांईन सेंटर हाऊसफुल्ल !
तहसिल कार्यालय सोमवार पर्यत बंद राहणार
तुळजापूर दि.१(क.वृ.):- तुळजापूर तालुक्यात तीन दिवसात विक्रमी संखेने सदुसष्ट कोरोना पाँजिटीव्ह रुग्ण सापडल्याने तालुक्यात सर्वञ भिती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे तहसिल कार्यालयातील तहसिलदार नायब तहसिलदार तीन लिपीक अशा पाच जणांचा अहवाल कोरोना पाँजिटीव्ह आल्याने तालुक्यात ऐकच खळबळ उडाली आहे.यात चार पुरुष ऐका महिलेचा समावेश आहे.
तालुक्यात गुरुवारी सोळा तर शुक्रवार पसतीस तर शनिवारी 16जणांचे अहवाल कोरोना पाँजिटीव्ह आला.
शनिवार रोजी अणदूरतीन तुळजापूर सात नळदुर्ग सहा कोरोना बाधीत रुग्ण आढळले
तुळजापूर तालुक्यात तिर्थक्षेञ तुळजापूर येथील तीन क्वारटांईन सेंन्टर फुल्ल झाले असुन शनिवार पासुन शुक्रवार पेठ भागातील आठवडा बाजार येथील नगरपरिषदेच्या नव्याने तुळजापूर विकास प्राधिकरणातुन बांधलेल्या धर्मशाळेत सुरु केले आहे येथे उस्मानाबाद तालुक्यातील काही मंडळी ना क्वारटांईन केले गेल्याने ही चर्चा तालुक्यात चाविष्टतेने चर्चिली जात आहे.
गुरुवारी तहसिल कार्यालायातील ऐक लिपीक कर्मचारी कोरोना बाधीत निघाला नंतर शनिवारी याच कार्यालयातील पाच जण असे ऐकुण सहा जण कोरोना पाँजिटीव्ह झाले.
तहसिल कार्यालयात कोरोना बाधीत अधिकारी कर्मचारी आढळल्याने यांच्या संपर्कातील मंडळी चांगले च हादरुन गेले आहेत. सुरक्षेच्या कारणांवरुन नागरिकांसाठी सोमवार पर्यत बंद ठेवले जाणार असुन मंगळवार रोजी कामकाज सुरु होणार आहे.
येथील क्वारटांईन सेंटर मध्ये बाहेरील तालुक्यातील मंडळी !
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे कोरोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या श्रीतुळजाभवानी मंदीर भाविकांना खुले करण्यास अडथळा ठरत आहे, असे असतानाही येथील क्वारटांईन सेंटर मध्ये बाहेरील तालुक्यातील लोक आणले जात असल्याने तालुका वासियांमधुन नाराजी व्यक्त केली जात आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे कोरोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या श्रीतुळजाभवानी मंदीर भाविकांना खुले करण्यास अडथळा ठरत आहे, असे असतानाही येथील क्वारटांईन सेंटर मध्ये बाहेरील तालुक्यातील लोक आणले जात असल्याने तालुका वासियांमधुन नाराजी व्यक्त केली जात आहे.
जनता कर्फ्यु स प्रतिसाद
सलग तीन दिवस कोरोना बाधीत रुग्ण तालुक्यात मोठ्या संखेने आढळल्याने शनिवार दि.१ रोजीचा जिल्हयाचा पुकारलेल्या जनता कर्फ्यु मोठा प्रतिसाद लाभला मुख्य रस्त्यावर लोक फिरकले नाहीत पण काहि ठिकाणी गल्ली बोळात युवक मंडळ माञ ऐकञित बसुन चर्चे करीत असल्याचे दिसुन आले.
0 Comments