महायुतीच्या वतीने वाघोली ता. मोहोळ येथे महादेवाला दुग्धाभिषेक घालून व गरजूंना दूध वाटप करून आंदोलन संपन्न
सरकारला सद्बुद्धी येऊ दे असे साकडे महादेवाला घातले - आंदोलक विकास वाघमारे
वाघोली दि.१(क.वृ.): भारतीय जनता पार्टी व रयत्न क्रांती शेतकरी संघटना व इतर घटक पक्षाच्या वतीने वाघोली ता.मोहोळ येथे दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. दुधाचा दर कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या सरकारला सद्बुद्धी येऊदे असे साकडे घालत महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक घालून उपसरपंच शेखर चोरमुले व भाजपा युवा नेते विकास वाघमारे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला सुरुवात झाली. महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करत दुधाची नासाडी न करता गरजूंना दूध वाटून आंदोलन संपन्न झाले. दुधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात द्यावे व दुध भुकटीला प्रति किलो 50 रुपये अनुदान दिले पाहिजे. माहाविकास आघाडीने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा इरादा केला आहे का? या सरकारच्या काळात पाणी 25 रुपये लिटर आहे मात्र दूध 17-19 रुपये लिटर आहे ही विदारक परिस्थिती आज राज्यात आहे, येणाऱ्या काळात तातडीने जर सरकारने दुधाला भाव वाढवून दिला नाही तर आंदोलनाचे मोठे पाऊल उचलणार असल्याचा इशारा भाजपा युवा नेते विकास वाघमारे यांनी यावेळी दिला.
यावेळी उपसरपंच शेखर चोरमुले, सिद्धेश्वर पवार, अनिल गावडे, भीमराव वाघमारे, नवनाथ वाघमारे, बजरंग माणके, नामदेव वाघमारे, नितीन पाटील आदी शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments