Hot Posts

6/recent/ticker-posts

सर्वांनी एकत्र येत जिल्ह्याचा विकास साधावा : आ. देशमुख

सर्वांनी एकत्र येत जिल्ह्याचा विकास साधावा : आ. देशमुख


सोलापूर सोशल फाउंडेशनडेशनतर्फे समृद्ध गाव अभियानांतर्गत चर्चासत्र

सोलापूर दि.२७(क.वृ.): समृद्ध गाव अभियानांतर्गत सर्वांनी एकत्र येत सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगिण विकास साधावा, जिल्ह्याचे नाव पहिल्या पाच विकासाभिमुख क्रमांकाच्या यादीत आणावे, असे प्रतिपादन सोलापूर सोशल फाउंडेशनचे मार्गदर्शक तथा आ. सुभाष देशमुख यांनी केले.
सोलापूर सोशल फाउंडेशन समृद्ध गाव अभियानांतर्गत वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आ.  देशमुख बोलत होते. लोकसहभागातून गावाचा विकास साधणे, सामाजिक बांधिलकी जपणे, गावामध्ये एका विशिष्ट व्यवसायाला नावारूपाला आणणे व समृद्ध गाव अभियानाद्वारे आपल्या गावाचा तालुक्याचा व पर्यायाने जिल्ह्याचा विकास साधण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यासाठी फाउंडेशनतर्फे मार्गदर्शन, प्रशिक्षण व व्यासपीठ उपलब्ध होणार असून व सर्वांनी मिळून एकत्रितपणे जिल्ह्याचे नाव लौकीकास आणून समृद्ध करण्यासाठी एकत्र  यावे, असे आवाहन चर्चेतील मान्यवरांनी केले. यावेळी फाउंडेशनतर्फे  तालुका व जिल्हास्तरीय पारितोषिक म्हणून सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कमही गौरवपूर्वक प्रदान करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली. चर्चासत्रात सल्लागार अजित कंडरे, कृषिभूषण अंकुश पडवळे, डॉ. माडगूळकर, मोहन अनपट, मेजर शामराव कदम, सुशील क्षीरसागर, सचिन झिंझाडे, दत्ता पाटील, हनुमंत कादे, भारती पाटील, हनुमंत बरबोले, विनायक सुतार , फाऊंडेशनचे सर्व कर्मचारी व जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी  उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments