Hot Posts

6/recent/ticker-posts

शिव छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथील कोविड सेंटरच्या सर्व निवासी डॉक्टरांना पी पी किट वाटप

शिव छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथील कोविड सेंटरच्या सर्व निवासी डॉक्टरांना पी पी किट वाटप

सोलापूर दि.७(देविदास माने)(क.वृ.): सोलापूर येथील केंद्रीय जमियते अहले हदिस दिल्लीची अधिकृत जिलई  जमियते अहले हदीस  सोलापूर तर्फे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये कोविड योद्धा म्हणून काम करणारे सर्व निवासी डॉक्टर व स्टाफ यांना पी पी ई किट च्या आत घालण्यात येणारा विशेष ड्रेस वाटप करण्यात आले . पी पी ई किट घातल्यानंतर शरीरातून जास्त प्रमाणात घाम सुटत असतो व कीट  घातल्यावर खूप त्रास होतो. म्हणून जमियत ने यांचा विचार करून त्रास होऊ नये यासाठी एक कापडाचे ड्रेस जानकारांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष ड्रेस तयार करून वाटप करण्यात  आले.सामाजिक बांधिलकी म्हणून जमियत तर्फे ही मदत करण्यात आली. ह्या कामासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ औदुंबर मस्के साहेबांचा मोलाचा सहकार्य लाभले. ह्या  वेळेस जिलई  जमियते अहले हदिस सोलापूरचे अध्यक्ष अब्दुर राफे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. की देशासमोर कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी प्रत्येकाने शासनाने दिलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करावे व कोविड योद्धांचा प्रोत्साहन वाढवण्यास सहकार्य करावे. व त्यांचे सन्मान करावे ह्या चे  पुढे ही जमियत आपल्या परीने वेळोवेळी मदत करण्यास तयार आहे. व पुढे करत राहील
आभार व्यक्त करताना वैद्यकीय अधीक्षक डॉ औदुंबर मस्के यांनी जमियत च्या ह्या कार्याची कौतुक करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या व पुढेही अशीच मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
ह्या कार्यक्रमास वहाब  चामाकोरा, इकबाल, उस्ताद, वारीस, कुडले, इक्बाल दलाल यांचे मार्गदर्शन लाभले.
या वेळेस दिली जमियते अहले हादीस सोलापूर ते सचिव मौलाना अब्दुल  रज्जाक शेख, उपाध्यक्ष मौलाना सर्फराज असरी, खजिनदार अ खालीक, मन्सूर, सहसचिव जाबीर अलोळी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments