युटोपियन शुगर येथे स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या अस्थीकलशाचे पूजन व श्रद्धांजली अर्पण

सहकारातील तपस्वी हरपला - भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख
सांगोला (जगन्नाथ साठे)दि.१९(क.वृ.): युटोपियन शुगर्स लि.कचरेवाडी मंगळवेढा येथे स्व. सुधाकरपंत (मालक ) परिचारक यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली,या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांनी श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त करताना सुधाकर पंत मालकांच्या जाण्याने जिल्ह्याचे सहकार,शैक्षणिक,आर्थिक क्षेत्रातील मोठे नुकसान झाले असून सहकारातील तपस्वी हरपला अशी खंत भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व.सुधाकरपंत (मालक) परिचारक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी सांगोला नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष नवनाथ भाऊ पवार, जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर, सांगोला तालुका भाजपा उपाध्यक्ष दिलीप सावंत,व्यवहारे साहेब, चीप अकाउंट खांडेकर साहेब, सतीश मामा शिंदे, यादव साहेब खडके साहेब,माधवानंद आकळे ,राजाराम कोळी,श्रीकांत देशमुख यांचे स्वीय सहायक सिद्धेश्वर गाडे आदि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments