Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रावणामासानिमित्त निघणारी 68 लिंग पदयात्रा यंदा रद्द ; 68 लिंग भक्त मंडळ व वीरशैव व्हीजनचा निर्णय

श्रावणामासानिमित्त निघणारी 68 लिंग पदयात्रा यंदा रद्द  
68 लिंग भक्त मंडळ व वीरशैव व्हीजनचा निर्णय 

सोलापूर दि.६(क.वृ.): श्रावणामासानिमित्त निघणारी 68 लिंग पदयात्रा यंदा रद्द करण्याचा निर्णय 68 लिंग भक्त मंडळ व वीरशैव व्हीजनने घेतला असल्याची माहिती भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली. 
1975 साली कै. उमाकांत सावळगी, कै. शरणप्पा मुद्देबिहाळ, संगप्पा बुरकुले, पावडेप्पा भुशेट्टी यांनी श्रावणाच्या पवित्र महिन्यात ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वर यांनी शहराच्या पंचक्रोशीत स्थापन केलेल्या दर्शन 68 लिंगांचे दर्शन घेण्याचे पुण्य पदरी पडावे यासाठी ही पदयात्रा सुरु केली. ती गेल्या 45 वर्षापासुन हि पदयात्रा अखंडीतपणे आजतागायत सुरु आहे. सध्या बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली 68 लिंग भक्त मंडळ व वीरशैव व्हीजन यांच्या वतीने या पदयात्रेचे आयोजन करण्यात येते .
श्रावणातील तिसऱ्या रविवारी प्रातःकाळी एकदा हर्र बोला हर्र, श्री सिध्देश्वर महाराज की जय या जयघोषात अभिषेक करुन दर्शन घेण्यात येते. यामध्ये शहराबरोबरच मुंबई, पुणे, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळ येथील जवळपास 300 भाविकांचा समावेश असतो . विशेष करुन या पदयात्रेत जेष्ठ नागरीकांचा सहभाग उल्लेखनीय असतो .
प्रतिवर्षी बाळी वेस येथे दिपकभाऊ निकाळजे बहुद्देशिय संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्या वतीने सहभागी भाविकांना फराळ व चहा देण्यात येतो .
परंतु यंदा कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे ग्रामदैवत सिद्धेश्वर व अन्य सर्वच मंदिरे सध्या बंद आहेत. यात्रा, उत्सव व पदयात्रा यावर शासनाने बंधने घातली आहेत. त्यामुळे ही पदयात्रा रद्द करावी लागत असल्याचे वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी सांगितले. 
घरी राहूनच यंदा सर्व सद्भक्तांनी ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर व त्यांनी स्थापन केलेला 68 लिंग यांची आराधना करावी. तसेच कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments