Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकनेते बाबूराव आण्णांच्या जयंती निमित्त वडाचीवाडी येथे 55 जणांनी केले रक्तदान

लोकनेते बाबूराव आण्णांच्या जयंती निमित्त वडाचीवाडी येथे 55 जणांनी केले रक्तदान

    

   

 

  

  

  

  

  




वडाचीवाडी दि.१(क.वृ. ):- कोरोना सारख्या माहामारीला हरविण्यासाठी रक्त कमी पडून नये म्हणून मोहोळ तालुक्यातील वडाचीवाडी या गावातील रक्तदात्यांनी खर्याअर्थानी कोरोना योध्द्याचे काम केले आहे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे मत श्रीहरी सार्वजनिक वाचनालयाचे विश्वस्त तथा आदर्श शिक्षक राजेंद्र सरवदे यांनी व्यक्त केले.
ते लोकनेते बाबूराव आण्णा पाटील व कै. हरीदास सुरवसे यांच्या जयंती निमित्त शनिवारी दि.१ ऑगस्ट २०२० रोजी वडाचीवाडी ता. मोहोळ जि. सोलापूर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरा प्रसंगी बोलत होते.

प्रारंभी लोकनेते बाबूराव आण्णा पाटील व कै. हरीदास सुरवसे यांच्या प्रतिमेचे पूजन गावाचे पोलीस पाटील अशोक लोंढे व अक्षय ब्लड बॅकेचे व्यवस्थापक उदय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वाचनालयाचे संस्थापक पांडुरंग सुरवसे, संस्थापक सचिव नेताजी सुरवसे, उपसंरपंच अरूण डोंगरे, रामेश्वर सुरवसे, सुहास म्हमाणे, उपस्थित होते.

सौ. शैलाताई शरद नाईकवाडी या महिलेने पहिल्यांदा रक्तदान करून बहुमान मिळवून महिलांचा व गावचा अभिमान वाढविला.

वाचनालयाचे विश्वस्त बंडू पासले, संजय निचळ, अशोक सरवदे, विजय सरवदे, नितेश नाईकवाडी, उमेश नाईकवाडी, गणेश डोंगरे, रामेश्वर चव्हाण, सुहास बचुटे, सिध्देश्वर बचुटे, महादेव माने, रणजित गवळी, ओंकार कुलकर्णी, महादेव डोंगरे, विशाल सुळे, मुकुंद बेडगे, प्रविण बचुटे, रामचंद्र डोंगरे, रविंद्र नागटिळक, आदेश नाईकवाडी, अनिल सुरवसे, विजयराज पवार, अक्षय कारंडे, योगेश चौधरी, कमलेश सुरवसे, या रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदात्यांनी मास्क लावूनच व फिजिकल डिस्टंस (शारीरिक अंतर ) ठेवूनच रक्तदान केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अक्षय ब्लड बॅकेचे, सुजाता, वाघमारे, साजदा नदाफ, नागेश म्हेत्रे, नम्रता, यमुना, सागर, झम्पले, वाचनालयाचे व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

Reactions

Post a Comment

0 Comments