Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षणाच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रिमंडळ उपसमितीच्या सदस्यांची चर्चा

    मराठा आरक्षणाच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांसमवेत मंत्रिमंडळ                                  उपसमितीच्या सदस्यांची चर्चा
           
मुंबई, दि.16 : मराठा आरक्षणाबाबत न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आढावा घेतला.  यावेळी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या संदर्भात माहिती दिली.  बैठकीस सदस्य मंत्री सर्वश्री. एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील तसेच महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, मुख्य सचिव संजय कुमार, विधि विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा, सचिव राजेंद्र भागवत  यांची उपस्थिती होती. 
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून 27 जुलै पासून न्यायालयात दररोज अंतिम सुनावणी सुरु होणार आहे.  राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावी बाजू मांडून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.  सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणीमध्ये शासनाची बाजू अशीच भक्कमपणे मांडण्यासंदर्भात या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या. 

Reactions

Post a Comment

0 Comments